यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून मुख्य सचिवांनी लॉकडाऊन (ब्रेक द चेन) ची घोषणा केली असून त्यानुसार यवतमाळ जिल्ह्याकरीता अधिसूचना जारी केली आहे. तसेच काही आवश्यक सेवांचा समावेश व काही बाबींना मुभा देण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्याकरीता सुट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवामध्ये व काही बाबींना खालीलप्रमाणे मुभा देण्यात येत आहे. यात पेट्रोलपंप आणि पेट्रोलियम संबंधीत उत्पादने, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सेवा पुरविणारे पुरवठादार, माहिती तंत्रज्ञान संबंधित पायाभुत सेवा, शासकीय व खाजगी सूरक्षा सेवा, फळविक्रेते या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
खालील खाजगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र भारत सरकारच्या दिशा निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शासन मार्गदर्शन सूचनेतील पात्रतेनुसार लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. सेबी व सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझीट आणि क्लिअरींग महामंडळे व सेबी अंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या मध्यस्था संस्था. सर्व नॉन बँकींग वित्तीय महामंडळे, सर्व सुक्ष्म पतपुरवठा संस्था, सर्व अधिवक्ता यांचे कार्यालये, जकात, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (लस, औषधी, जीवरक्षक औषधांशी संबंधीत वाहतूक). ज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत तसेच शनिवारी व रविवारी रेल्वेने, बसेस, विमानाने प्रवास करीत असतील तर त्याला अधिकृत टिकीट बाळगावे लागेल. जेणेकरून संचारबंदीच्या कालावधीत स्थानकापर्यंत किंवा घरापर्यंत प्रवास करू शकेल.
जिल्ह्यात सात मृत्युसह 327 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 337 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 62 व 72 वर्षीय पुरुष तसेच 58 वर्षीय महिला, महागाव 61 व 82 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वणी येथील 78 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या 327 जणांमध्ये 207 पुरुष आणि 120 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 106 पॉझिटिव्ह रुग्ण, उमरखेड 61, महागाव 29, पुसद 23, कळंब 14, नेर 14, झरीजामणी 14, घाटंजी 11, आर्णी 11, वणी 10, दारव्हा 9, दिग्रस 8, पांढरकवडा 5, बाभुळगाव 4 आणि इतर शहरातील 8 रुग्ण आहे.
औद्योगिक कामगारांना त्यांच्या कामाच्य ठिकाणी जाणे - येणे करण्याची व कामाच्या पाळीनुसार हजर होण्याकरीता आवश्यकतेनुसार खाजगी बसेस, खाजगी वाहने यांच्या सहाय्याने त्यांचे वैध ओळखपत्र दाखवून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच शनिवारी व रविवारी प्रवासात मुभा राहील. प्रार्थना स्थळे सद्यास्थितीत नागरिकांना बंद करण्यात आलेली आहेत, परंतु प्रार्थना स्थळामध्ये सेवा देणारे व्यक्ती त्यांच्या सेवा आणि धार्मिक कार्य चालू ठेवतील. प्रत्यक्ष परिक्षेला हजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे परिक्षेचे वैध ओळखपत्र दाखवून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच शनिवारी व रविवारी या कालावधीत प्रवास करायचा असेल तर मुभा राहील.
आठवड्याचा शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी संचारबंदीच्या दरम्यान विवाह समारंभ असल्यास स्थानिक प्राधिकरणांने त्यासंदर्भात जिल्ह्यातील कोविड स्थिती लक्षात घेवून दिनांक 4 एप्रिलमध्ये नमुद असलेल्या अटी व शर्ती नुसार परवानगी देण्याची कार्यवाही करावी. ह्यासाठी संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांना परवानगी देण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे.
घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी इ. लोकांच्या सेवाबाबत यांच्या रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत ये – जा करण्याच्या बाबतीत स्थानिक प्राधिकरण योग्य तो निर्णय घेईल. सदर आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तिवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 कलमानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास या आदेशाद्वारे पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात येत आहे.सदरचे आदेश हे आदेशाच्या दिनांकापासून 30 एप्रिल 2021 चे 23.59 वाजेपर्यंत संपूर्ण यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response