Breaking

Post Top Ad

सोमवार, ३१ मे, २०२१

'प्रेम विवाहचा राग अन् बापाने ओकली आग'

'प्रेम विवाहचा राग अन् बापाने ओकली आग'
बापाने केला मुली व जावाई वर प्राणघात हल्ला 

महाराष्ट्र24 आर्णी-यवतमाळ'प्रेम म्हणजे प्रेम असते,तुमचं आमचं सेम असते'. मात्र संकल्पना समाजातील सर्वच घटकाला लागु पडेल असे नाही. प्रेमाचा आणाभाका घेत एक तरूण आणि एक तरूणी हे दोघे घरच्या नातेवाईकांच्या ईच्छे विरोधात जाऊन साता जन्माच्या गाठी बांधत पाच वर्षा आधी पसार झाले. 

 

मुलीच्या वडिलाने मुलगी व मुलाचा शोधा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या दोघांचा ही थांगपत्ता लागला नाही.तेव्हा पासून प्रचंड संतापलेल्या मुलीच्या वडिलाने रविवारी रात्री उशीरा स्वतःच्या मुली वर आणि जावाई वर चाकुने सपासप वार करून दोघालाही गंभीर जखमी केल्याची घटना आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिकणी(क) येथे घडली.


दरम्यान या घटनेची फिर्यादी सागर चे काका नारायण अंभोरे यांनी पोलीस स्टेशनला रविवारी रात्री अकरा वाजता दिली.त्यावरून पोलीसांनी आरोपी दादाराव माटाळकर यांच्या विरोधात जीवाने मारण्याच्या उद्देशाने आणि जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल केले आहे.पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

'प्रेम विवाहचा राग अन् बापाने ओकली आग'

या घटनेत शुभांगी सागर अंभोरे आणि सागर काशीनाथ अंभोरे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. आरोपी व जखमी असलेल्या मुलीचे वडिल दादाराव सिताराम माटाळकर यांने मुलगी शुभांगी आणि जावाई यांच्या घरात जावून चाकुने सपासप वार करून प्राणघातक हल्ला केला. २०१६ साली शुभांगी आणि सागर अंभोरे हे दोघेही पळून गेले होते. 
 
 
त्या नंतर दोघांनी आंतरजातीय विवाह केला. त्यामुळे आरोपी दादाराव सिताराम माटाळकर यांना आपली समाजात बदनामी होत असल्याचा राग त्याच्या मनात सतत येत होता.
 
 
त्यातूनच रविवारी दादाराव सिताराम माटाळकर यांने मुलगी आणि जावाई च्या घरात जावून मुलीच्या पोटावर चाकुने हल्ला केला. त्यानंतर जावाई सागर अंभोरे यांच्या डाव्या हाताच्या खांद्यावर हल्ला करून दोघाला गंभीर जखमी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad