'दिव्यांगाच्या मदतीला धावले आमदार संजय राठोड'
महाराष्ट्र24 । यवतमाळ: राजकारणाची व्याख्या म्हणजे निवडणूकीत पैसे लावा आणि नंतर सात पिढ्या पुरेल एवढे पैसे कामवा अशी चर्चा नेहमी सामान्य नागरिकांमध्ये होत असते. मात्र याला अपवाद ठरले ते म्हणजे राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे दिग्रस,दारव्हा-नेर मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी एका दिव्यांग बांधवाला घरपोच रुग्णवाहिका पाठवून त्यात पलंग, एअर बेड आणि इतर आवश्यक साहित्य पाठविल्याने त्या दिव्यांग बांधवाने आमदार संजय राठोड यांची थेट देवासोबत तुलना केल्याने आमदार संजय राठोड यांचे कौतुक होत आहे.
रामेश्वर ला मदत देताना शिवसैनिक
ज्या दिव्यांग बांधवाला आमदार संजय राठोड यांनी उपयुक्त साहित्य पाठविले त्या बांधवाचे नाव आहेत रामेश्वर राठोड. 'रामेश्वर' हा सोशल मिडीया वर नेहमी अॅक्टीव्ह असतो. एका आजारामुळे तो गेल्या कितेक वर्षांपासून घरीच पडून असल्याने त्याला अंपगत्व आले आहे. परिनामी रामेश्वर हा एका खाटेवर पडून सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगातील घडामोडी वर नजर टाकत असतो. मात्र 'आमदार संजय राठोड' पालकाच्या रूपात 'रामेश्वर'च्या मदतीला धावून आल्याने रामेश्वर ने आमदार संजय राठोड बदल भावनिक पोस्ट टाकून 'आमदार राठोड' यांची तुलना थेट देवा सोबत केली आहे.
"संजय राठोड हे माझ्यासाठी देवच"
मी गेल्या अनेक वर्षांपासून आजाराने ग्रस्त असल्याने एकाच जागी पडून असतो. दोन वेळा माझी आमदार संजय राठोड साहेब यांनी भेट देखील घेतली. मात्र मी त्यांच्या कडे कोणतेही मागणी केली नसताना अचानक माझ्या घरी शिवसेनेच्या रुग्णवाहिकेत माझ्या करिता पलंग,एअर बेड सह आदी वस्तू पाठवून आमदार संजय राठोड साहेब माझ्या सोबत भ्रमणध्वनी वरून बोलल्याने मला खुप बर वाटलं, काहीवेळेसाठी तर मी ठणठणीत आहोत असं वाटत होते. आमदार संजय राठोड साहेब हे माझ्य साठी देवच असून त्यांनी माझ्या वर केलेल्या उपकाराची परत फेड कशी करू अशी प्रतिक्रिया दिव्यांग रामेश्वर राठोड यांनी व्यक्त केली.आमदार संजय राठोड यांचे कार्य जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मात्र अलीकडे त्यांना एका प्रकरणात बदनाम केल्याने त्यांनी स्वतःहून मंत्रीपदाचा राजीनामा दिला. दिग्रस,दारव्हा-नेर या विधानसभा मतदार संघात आमदार संजय राठोड यांचा फोटो अक्षरशः देवघरात ठेवल्या जाते, त्यामुळे आमदार संजय राठोड यांच्या लोकप्रियेतेची दखल शिवसेनापक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन त्यांना पुन्हा मंत्री मंडळात सन्माने स्थान देण्याची मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response