Breaking

Post Top Ad

सोमवार, २४ मे, २०२१

"अंगावर येण्याचा प्रयत्न कराल तर शिंगावर घेऊ": आ.संजय राठोड

"अंगावर येण्याचा प्रयत्न कराल तर शिंगावर घेऊ": आ.संजय राठोड
महाराष्ट्र२४ | यवतमाळ: आज सर्व जण कोरोना महामारीशी दोन हात करित आहे. मात्र काही लोकं स्वतःचे स्वार्थ कसे गाठता येईल या कडे जास्त लक्ष केंद्रित करित आहे. त्यांना नागरिक मेली का अन् जगली का यांच्या काही देणे घेणे नाही. मात्र तुम्ही जर उगाच आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करित असाल तर आम्ही शिंगावर घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा खणखणीत ईशारा राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी महाराष्ट्र२४ शी बोलतांना दिला.


मंत्री पदाचा राजीनामा दिल्या पासून आमदार संजय राठोड यांनी स्वतःच्या मतदार संघात लक्ष केंद्रित केले आहे. अशात काही बेडूक आमदार राठोड वर डूरडूर करित असून त्याला उत्तर म्हणुन आमदार संजय राठोड यांनी थेट शिंगावर घेण्याचा ईशारा दिलाय. दरम्यान यावेळी आमदार संजय राठोड बोलतांना पुढे म्हणाले की, कोरोना संकटात नागरिकांना मदत करण्याची आवश्यकता आहे. परंतू आमदार संजय राठोड हे पहिले सारखे आता आक्रमक राहीले नाही, अशा चुकीचा गैरसमज समज करून घेतल्याने काही जण अंगावर येण्याचा प्रयत्न करित आहे. आमदार संजय राठोड यांनी काही दिवसा करिता आपण शांत राहणार असून फक्त आणि फक्त नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यात मला रस असेल असे त्यांनी स्वतःहून सांगितले आहे.आमदार संजय राठोड पुन्हा आक्रमक भूमिकेत दिसणार हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad