महाराष्ट्र२४: काही महिन्या आधी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काही तासा आधी विरोधकांनी मागणी लावून धरली. त्याअनुषंगाने मंत्री संजय राठोड यांनी पक्षाची, समाजाची व स्वतःची बदनामी होऊ नये तसेच संबधित प्रकरणाची निष्पक्ष चौकाशी व्हावी यासाठी राजीनामा दिला.
आमदार संजय राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्या नंतर विरोधकांनी आणि शिवसेनेतील एका गटातील काही नेत्यांना जणू काही दिवाळीच साजरी केली असे चित्र राजकीय वर्तुळात दिसत होते. दुसरी कडे बंजारा समाजातील तांड्यातील नागरिकांवर मोठं संकट कोसळला असे वातावरण निर्माण झाले होते. बंजारा समाज म्हणजे दऱ्याखोऱ्या आणि तांड्यात राहणारा समाज.बंजारा समाजात आजही शैक्षणिक,आर्थिक ह्या बाबी मजबूत नाही. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि स्व.बाळासाहेब ठाकरेंचा विचाराचा प्रभाव असलेले आमदार संजय राठोड हे देखील तांड्यातीलच आहे. शिवसेनेतून संजय राठोड यांनी राजकीय प्रवास सुरू केला.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेले मेल
शिवसेना जिल्हाप्रमुख असतांना संजय राठोड यांनी शेतकरी,कष्टकरी करिता उभारलेल्या अनेक उग्र आंदोलनाची खुद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दखल घेत त्यांना आमदारकीची तिकीट दिली. दारव्हा-नेर मतदारसंघातून संजय राठोड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. पहिल्याच टर्म मध्ये संजय राठोड यांनी काॅग्रेसचे माजी मंत्री तथा तात्कालीन प्रदेशाध्यक्षा माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला.तद्नंतर संजय राठोड यांनी मतदारसंघातील रूग्णांसाठी आरोग्यदूत म्हणुन काम सुरू केले. शासकीय रूग्णालयात रूग्णांना चांगली सुविधा मिळावी म्हणुन अनेक वेळा 'राठोड' यांनी शिवसेना स्टाईलने कामचुकार डाॅक्टरांना धडा शिकविला त्यामुळे आमदार संजय राठोड हा नाव जिल्ह्यातील प्रत्येक घराघरात पोहचला.
'शिवसेनेला बंजारा मतदारांचा फटका बसण्याची शक्यता'?
आपल्या देशात कोणावरही आरोप करण्यासाठी पैसे लागत नाही,आरोप फुकटात करता येते. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर घाणेरडे आरोप विरोधी पक्षाने केले आणि राठोड यांना मंत्रीपद सोडावं लागलं.मात्र आमदार संजय राठोड यांना शिवसेनेने पुन्हा मंत्री पद न दिल्यास येणाऱ्या निवडणूकीत बंजारा समाजातील मतदारांचा फटका बसणार असल्याची चर्चा बंजारा समाजात सुरू असून दुसऱ्या बाजूने समाजात मुख्यमंत्री ठाकरे हे संजय राठोड यांना पुन्हा मंत्री करतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केल्या जात आहे.
पुण्यात एका बंजारा समाजाच्या मुलीने आत्महत्या केली आणि त्यांचा खापर विरोधकांनी आमदार संजय राठोड वर फोडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर दाबाव टाकत "अर्थसंकल्पाच्या आधी राजीनामा घ्या,अन्यथा सभागृह चालू देणार नाही" अशी भूमिका घेतल्याने आमदार राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला. विशेष म्हणजे आमदार संजय राठोड यांच्यावर कुठेही गुन्हा दाखल झाला नाही,कोणत्याही न्यायालयात खटला सुरू नाही,एवढेच काय तपासात काही निष्पन्न झालेला नाही. त्यामुळे जिल्हा सह संपुर्ण राज्यातून आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्री पद द्या ह्या मागणी करिता दररोज लाखो मेल मुख्यमंत्र्यांना पाठिल्या जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response