यवतमाळ गत एक वर्षांपासून आपल्या देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेनुसारच दुसऱ्या लाटेने सुद्धा जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोरोनाचे दुसऱ्या लाटेतील परिवर्तित झालेला विषाणू अधिक संसर्गजन्य असल्याने रुग्ण संख्या अचानक वाढली आहे व त्यामुळे रुग्णालयात बेड व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे.ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे उशिरा रुग्णालयात येत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर होत आहे त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे.
अंतिम संस्कार करतांना प्रत्येक धर्माचे रूढी व परंपरे अनुसारे आम्ही अंतिम संस्कार करतो.ह्या कार्यात गेल्या वर्षात अनेक सामाजिक संघटनांनी आम्हाला मदत केली.पार्थिव देहाचे पावित्र्य कायम ठेवून होताहोत्सव मृतकाच्या आप्तेष्ठांना आम्ही अंतिम संस्कार स्थळी बोलावतो.दुसऱ्या दिवशी मृतकाची रक्षा व अस्थी सुद्धा आम्ही नातेवाईकांना सुपूर्द करतो असे ह्या कार्यात वाहून घेतलेल्या डॉ विजय अग्रवाल यांनी सांगितले.ह्या कार्यात कुठेही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही ह्या कार्यात तत्पर राहू असे माजी मंत्री आमदार संजय राठोड यांनी डॉ विजय अग्रवाल ह्यांना आश्वस्थ केले.
अशातच सर्व जिल्ह्यातील गंभीर रुग्ण यवतमाळ येथे उपचाराला येत असल्याने अनेक रुग्ण यवतमाळ येथे कोविड आजाराने मृत्युमुखी पडतात.कोरोनाचे नियमानुसार त्यांचे अंतिम संस्कार हे यवतमाळ नगरपालिका करते.मे 2020 ते आज पर्यन्त एकूण 1222 कोरोना मृतकांवर नगर पालिका यवतमाळने अंतिम संस्कार केले आहेत.हे अंतिम संस्कार करणाऱ्या सर्व कोरोना योध्यांची दखल घेणे आवश्यक होतेच.माजी मंत्री आमदार संजय राठोड यांना ही बाब प्रकर्षाने जाणवली.त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र दीना निमित्य ह्या कोरोना योध्यांचे छोटेखानी कौतुक सोहळा आमदार संजय राठोड यांचे जनसंपर्क कार्यालयात घेण्यात आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response