महाराष्ट्र२४: राज्याचे रोहयो, फलउत्पादन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सध्या कोरोनामुळे देश,राज्य आणि तमाम नागरिक संकटाला समोर जात असताना मात्र मंत्री महोदयांनी काही दिवसा आधी त्यांच्या मतदारसंघात विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मोठी गर्दी जमवली होती.
न्यायालयात याचिका दाखल झाल्या नंतर राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी माफिना सादर केला असता न्यायालयाने तो माफीनामा स्विकार केला. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री भुमरे यांच्या अडचणीत वाढवण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. स्थानिक राजकारणामुळे मंत्री भुमरे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मंत्री भुमरे यांनी मोठी गर्दी जमवून कोरोना महामारीचे नियम धाब्यावर ठेवून मोठा वाजागाजा करित विकास कामांचे उदघाटन केल्याने राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती.त्या अनुषंगाने मंत्री भुमरे यांना वगळून पाच जणांवर प्रशासनाने कारवाई केली.मात्र मंत्री भुमरे यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने राष्ट्रवादीचे नेते यांनी थेट न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावत या संदर्भात पोलिसात तक्रार देण्याची मुभा संबधित नेत्यांना न्यायालयाने दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response