महाराष्ट्र24 : मुंबई हरित क्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले कै.वसंतराव नाईक साहेब यांना केंद्रात सत्तेत बसलेल्या भाजप सरकारने भारतरत्न देण्याची धाडस 'मोदी सरकार'ने दाखवावी असे आवाहन राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे नेते आमदार संजय राठोड यांनी केले.
रामराव महाराजांना पद्मभूषण पुरस्कार का दिला नाही?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी अनेक वेळा रामराव महाराजांना पद्मभूषण पुरस्कार देण्यासंदर्भात पाठपुरवा केला. मात्र तेव्हा रामराव महाराजांना पद्मभूषण पुरस्कार दिला नाही, मग बंजारा समाजा बदल आता का कळवळा आला अशा सवाल शिवसेना नेते आमदार संजय राठोड यांनी उपस्थितीत केला आहे.
सध्या माजी मंत्री तथा 'शिवसेनेचे आमदार संजय राठोड' हे राज्यव्यापी दौरा वर आहेत. दरम्यान नवी मुंबई विमानतळ नामांकन विषय चांगलाच गाजत आहे. अशात भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षातील बंजारा समाजाच्या चिल्या-पाल्या नेत्यांना हाताशी धरून नवी मुंबई विमानतळाला कै.वसंतराव नाईक साहेब यांचे नाव देण्याची मागणी लावून धरण्याबाबत आग लावत आहे. त्यामुळे भाजपने सामाजात आगलावण्याचा उद्योग त्वरीत बंद करावे अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी भाजप ला फटकारले आहे.
'नाईक-ठाकरे' परिवारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते
सध्या नवी मुंबई विमानतळ नामांकनाच्या विषयावर भाजप राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी बंजारा समाज सह इतरही समाजातील नागरिकांमध्ये आग लावण्याचे काम करित आहेत. हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री 'वसंतराव नाईक' आणि शिवसेनाप्रमुख 'बाळासाहेब ठाकरे' यांची मैत्री राज्याने बघितली आहे.त्यामुळे विमानतळाला नाईक किंवा ठाकरे साहेबांपैकी कोणाचेही नाव दिल्यास बंजारा समाजाला आनंदच होईल.
बंजारा समाजा बदल 'भाजप'ला खरच प्रेम असेल तर मोदी सरकारने आधी कै.वसंतराव नाईक साहेबांना 'भारतरत्न' देऊन सन्मान करून दाखविण्याचे आवाहन भाजपला राठोड यांनी केले आहे. भाजप नेते निवळ बंजारा समाजातील नागरिकांची दिशाभूल करून समाजात आगलावण्याचा प्रयत्न करित असल्याची जहरी टिका राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response