महाराष्ट्र24 । जालना: राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्या पासून संपुर्ण राज्यातील बंजारा समाजाची भेटीगाठी घेत आहे.
राज्यात बंजारा समाज एक कोटी च्या जवळपास आहेत. समाजात अद्यापही संघटन च्या दृष्टीने कोणत्याही राजकीय नेत्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी दौरा केलेला नाही. मात्र आमदार संजय राठोड यांनी समाजाची अडचणी आणि समाजाला एकत्रीत आणण्याच्या दृष्टिकोनातून संपुर्ण राज्य पिंजून काढत आहेत.
पालघर पासून सुरू केलेल्या दौऱ्याच्या दुसरा टप्पा परभणी,जालना ह्या जिल्हात पोहचला आहे. समाज बांधवांकडून आमदार संजय राठोड यांच्या दौऱ्याचा जोरदार स्वागत गेल्या जात असून नागरिक भेट घेण्यासाठी प्रचंड गर्दी करित आहे. बंजारा समाजाची मतदार संख्या राज्यात निर्णायक आहेत. त्यामुळे समाज संघटित झाल्यास राजकीय समीकरण बदलण्याची ताकत बंजारा समाजात आहे. त्यामुळेचे आमदार संजय राठोड राज्याचा दौरा करून समाजाला एकत्री आणण्यासाठी प्रयत्न करित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response