महाराष्ट्र24 । यवतमाळ: 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत सामान्य नागरिकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणजे 'शिवसेना' राज्यात शिवसेना म्हणजे युवकांची आवढती संघटना म्हणुन ओळखल्या जाते.
यवतमाळ जिल्ह्याच्या इतिहासात शिवसेनेचे आक्रमक जिल्हाप्रमुख म्हणुन संजय राठोड, बाळासाहेब मुनगिनवार यांची नावे घेतल्या जाते.मात्र आक्रमक शिवसेने सारख्या संघटनेत संवेदनशील आणि शांत जिल्हाप्रमुख म्हणुन 'पराग पिंगळे' यांच्या कडे पाहिल्या जाते. पिंगळे यांनी राजकीय प्रवास सन २०१३ साली पासून महाराष्ट्र नवनिर्णाण सेनेतून सुरू केला. पराग पिंगळे हे महाराष्ट्र नवनिर्णाण सेनेचे यवतमाळ शहर प्रमुख म्हणुन यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली, मात्र मनसे मधील गढूळ चित्र पाहून त्यांनी अवघ्या तीनच महिण्यात 'मनसे'ला जय महाराष्ट्र केला.मनसेला सोडचिठ्ठी दिल्या नंतर पिंगळे यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता, तद्नंतर आमदार संजय राठोड यांनी पराग पिंगळेंना भेटण्यासाठी बोलावले त्या दरम्यान पिंगळेंना शहर प्रमुख ची जवाबदारी देण्याची तयारी आमदार राठोड यांनी दाखवली. मात्र "दुसऱ्यांकडून पद काढून मला देणार असाल तर मी ते पद घेणार नाही" अशी भूमिका पराग पिंगळे यांनी घेतली.यवतमाळचे शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणुन त्यावेळी राजेंद्र गायकवाड काम पाहत होते. त्यामुळे गायकवाड यांना उपजिल्हाप्रमुख पदाची जवाबदारी दिली आणि पराग पिंगळेंना शहर प्रमुखपदी निवड केली. तेव्हा पासून पराग पिंगळे यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.शहर प्रमुख म्हणुन काम करतांना 'पराग पिंगळें'चा काम शिवसेनेच्या नेत्यांना आवडलं आणि नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणूकीत घवघवीतपणे सेनेला यश मिळवून दिल्याने खुद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पराग पिंगळेंना शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणुन त्यांची नियुक्ती केली.Post Top Ad
रविवार, ६ जून, २०२१
'शिवसेनेचे संवेदनशील जिल्हाप्रमुख पराग पिंगळे'
वाढदिवस विशेष ७ जून
यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणूकीत कायम शिवसेनेची पीछेहाट झालेले असतांना पराग पिंगळे यांनी पहिल्यांदाच आमदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणले. तद्नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सदस्य निवडून आल्याने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांच्या संघटन बांधणीचे कौतुक केले. खुद पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दखल घेऊन पिंगळेच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली होती.
Tags
महाराष्ट्र#
राजकारण#
विचारमंच#
Share This
About TeamM24
विचारमंच
लेबल:
महाराष्ट्र,
राजकारण,
विचारमंच
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Post Top Ad
Author Details
मराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response