Breaking

Post Top Ad

मंगळवार, १ जून, २०२१

बहिणीची छेड काढणाऱ्यांची भावा कडून हत्या

बहिणीची छेड काढणाऱ्यांची भावा कडून हत्या
महाराष्ट्र24आर्णी-यवतमाळबहिणीची रोज छेड काढून त्याला नाहक त्रास देऊन बदनामी करणाऱ्या वीस वर्षीय युवकांची दगडाने ठेचून हत्या केल्याची खळबळ जनक घटना आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंतरगांव येथे सोमवारी रात्री आठ वाजता दरम्यान घडली.


समीर छोटू शेख असे घटनेतील मृतकांचे नाव आहे. वीस दिवसा आधी मृतक नामे समीर शेख यांनी आरोपी नामे पवन विजय राठोड रा.अंतरगांव याला कोळवण परिसरातील एका विटभट्टी जवळ अडवून आर्णी येथील पाच गाव गुड्यांना आणुन आरोपीला बेदम मारहाण केली. या संदर्भात आरोपीने बहिणीची बदनामी होईल या भीतीपोटी पोलीसात तक्रार दिली नाही.
परिनामी मृतक समीर ची हिम्मत वाढल्याने सोमवारी आरोपी पवन हा गावातील एका किराणा दुकाना जवळ बसू असताना मृतक समीर हा त्यांच्या जवळ जावून हुज्जत घालत "क्यू भूल गया क्या, क्या करा तू ने मेरा, और होना क्या" असे बोलून वाद घातला त्यामुळे हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, यात आरोपीने मृतकांच्या डोक्यावर दगड मारला त्यामुळे मृतक हा जवळच्या नदीमध्ये पडून जागीच ठार झाला.

दरम्यान या घटनेची तक्रार मृतकचा मोठा भाऊ नामे अमिन छोटू शेख यांनी पोलिसात दिली असून तक्रारीत त्याने माझ्या भावाला आरोपी पवन आणि त्याचे वडिल विजय परसराम राठोड यांनी संगनमत करून मृतका सोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशय कारणावरून दगडाने छातीवर व डोक्यावर मारून गंभीर जखमी केले. 

रात्री तीन वाजेपर्यंत गावात तणाव
अंतर गाव येथे प्रेम संबंध च्या कारणावरून झालेल्या वादात एका वीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. रात्री उशिरा पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नंतर मृतकाच्या नातेवाईकांकडून घटनेतील आरोपीला अटक करा अशी मागणी लावून धरल्याने गावात रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.

मृतक ला उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डाॅक्टरांनी त्याला मृत्यू घोषीत केल्याचे म्हटले आहे. त्या वरून आर्णी पोलीसांनी पवन राठोड व विजय राठोड यांच्या विरोधात जीवाने मारल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पवन ला पोलीसांनी अटक केली आहे. या घटनेचा तपास ठाणेदार पितांबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम पोलीस निरीक्षक शिवराज पवार आणि जमादार सतीश चौघार हे करित आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad