महाराष्ट्र24 । यवतमाळ: दारूच्या नशेत आप-आपसामध्ये सार्वजनिक ठिकाणी वाद करून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची वाहने अडवून लुटमार करित असल्याची माहिती भ्रमणध्वनी वरून पोलीसांना मिळाली त्यामुळे घटनास्थळी पोलीस स्टाॅप रवाना होऊन तिघांना पोलीसांनी ताब्यात घेत ठाण्यात आणलं.
प्रमुख आरोपीचे नाव जावेद खान, शोएब खान, शाहरूख खान, राजु खान, अयुब सरकार, शारिफ चाऊस, साहेब डाॅन, नवाब उर्फ विकी, खाजा खान, रिजावान कैची, अरबाज खान, शाकीर शेख, अजर शेख, सोहेल मारी, फिरोज शेखर यांच्या सह इतर २०० पेक्षा जास्त जणांविरुध्द दारव्हा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मात्र ताब्यात घेतलेल्या पैकी शेख इरफान शेख शब्बीर यांच्या छातीमध्ये अचानक दुखत असल्याने त्याला उपजिल्हा रूग्णालयात नेलं असता डाॅक्टरांनी इरफान ला मृत्यू घोषीत केलं. मृतक इरफान ची माहिती त यांच्या नातेवाईकांना मिळताच नातेवाईकांनी संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करून गैर कायदेशीर २०० पेक्षा जास्त मंडळी जमवून पोलीस स्टेशन वर दगड आणि लाठ्या काठ्या घेऊन अंदाधुंद देगडफेक केल्याने कर्तव्यावर हजर असलेल्या तीन पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना गंभीर दुखापत झाली.त्यामुळे कलम ३२५, ३५३, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, ४२७, १८८, २६९, २७० भादवी सहकलम ३(ई) नुसार एकुण २०० पेक्षा जास्त जणांविरुध्द दारव्हा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response