ऐतिहासिक खुलास्याने ब्लॅक डायमंड सिटी प्रकाशझोत
प्रा.सुरेश चोपणे यांचे मूळ गाव वणी आहे. ते गेल्या काही वर्षांपूर्वी चंद्रपूर येथे संशोधनांनीमत्त स्थायिक झाले आहे. भारतीय विज्ञान काँग्रेस कोलकताचे सदस्य, मराठी विदर्भ संशोधन संस्थेचे सदस्य, तसेच पर्यावरण व खगोल शास्त्र संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. भूशास्त्र व पुरातत्व या विषयावर ते गेल्या काही वर्षांपासून संशोधन करीत आहे. बोर्डा परिसरात भूकंपाचा अभ्यास करीत असतांना त्यांनी जमिनीवरील पहिल्या सजीवांची जीवष्मे नुकतीच शोधून काढली. त्यावेळी त्यांनी दीडशे ते दोनशे कोटी वर्षांपूर्वी विदर्भात समुद्र असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली होती.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
जिल्ह्यात ६ कोटी वर्षापूर्वी डायनोसोर सारखे विशाल प्राणी वास करीत होते.घनदाट जंगले होती,परंतु महाराष्ट्रातील ह्या मोठ्या ज्वालामुखी उद्रेकामुळे सर्व जंगले ,जीव जंतू जळून राख झाले. ३० हजार वर्षे लाव्हारस वाहत येत होते. पुढे हा प्रलय थांबला आणि नव्याने सजीव सृष्टी निर्माण झाली.मानवाचा विकास ५० लाख वर्षानंतर विकसित झाला. हे खडक भोगोलिक दृष्ट्या अतिशय महत्वाचे असून प्रशासनाने तेथे आढळलेली दगडी खांब आणि परिसर संरक्षित आणि सुशोभित करावा. प्रा. सुरेश चोपणे
यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसर हा ऐतिहासिक दृष्ट्या प्राचीन आहे. त्याहीपेक्षा हा परिसर भौगोलिक दृष्ट्या अतिप्राचीन आहे.याच परिसरात २०० कोटी वर्षाची स्ट्रोमेटोलाईटची, ६ कोटी वर्ष पूर्वीची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे यापूर्वी पांढरकवडा, मारेगाव तालुक्यात प्रा.चोपणे यांनी शोधून काढली होती. झरी तालुक्यात आता प्रकाश झोतात आलेल्या ह्या अश्म खांबाची माहिती त्यांना ५ वर्षापासून होती.७ कोटी वर्षापूर्वी पर्यंत विदर्भात समुद्र होता परंतु ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लावारस यवतमाळ जिल्हा आणि मध्य विदर्भा पर्यत वाहात आला.
लावरसाच्या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना दक्खनचे पठार नावाने ओळखले जाते. हा ज्वालामुखी परिसर मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात आणि पश्चीमेकडे ६ हजार ६०० फुट जाडीचा आहे.महाराष्ट्रात ८० टक्के हा बेसाल्ट अग्निज खडक आहे .तर भारतात कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अश्याच कॉलमनार बेसाल्ट साठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे .महाराष्ट्रांत मुंबई,कोल्हापूर,नांदेड येथे हे खडक आढळले असून आता त्यात यवतमाळ जिल्ह्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले जाणार आहे.
विदर्भ प्रदेशात ह्या खडकाची जाडी कमी आहे त्यामुळे गेल्या हजारो वर्षापासून भूस्खलन होऊन प्राचीन खडक उघडे पडत आहे.वणी परिसरात तप्त लाव्हारस वाहात आला तेव्हा येथील नद्यात तो पडून अचानक थंड झाला त्यामुळे त्याचे आकुंचन पावून षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले,त्यांना कॉलमनार बेसाल्ट असे म्हणतात.इतर ठिकाणी तशी स्थिती नसल्याने तेथे ते होऊ शकले नाही.अनेक ठिकाणी षटकोनी खांबां ऐवजी पंच किंवा सप्तकोणी खांब सुधा आढळतात .हे खांब अगदी मानवाने ऐतिहासिक काळात मंदिरांच्या बांधकामासाठी वापरले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response