Breaking

Post Top Ad

बुधवार, ७ जुलै, २०२१

दारव्हा पोलीस स्टेशन वर दगडफेक

दारव्हा पोलीस स्टेशन वर दगडफेक


महाराष्ट्र24 दारव्हा-यवतमाळ: दारव्हा शहरात काल मंगळवारला रात्री ८ वाजता दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये ेपोलीसांच्या मारहाणीत मृत्यु पावलेल्या रेल्वे स्टेशन परीसरातिल मृतक शेख इरफान शेख शब्बिर वय ३० वर्षे याला मारहाण  करणाऱ्या पोलीस कर्मचायांवर खुनाचा  गुन्हा नोंद करावा अशी तक्रार मृतकाचा लहान भाऊ शेख जाबीर शेख शब्बीर यांनी आज बुधवार दि.७ जुलैला दारव्हा पोलीस स्टेशनला दिली आहे.

अमरावती पोलीस उप महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना तसेच यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबल दारव्हा येथे ठाण मांडुन आहे. या घटनेबाबत अमरावती पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांना विचारणा केली असता तपास सिआयडी कडे जाण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. तसेच विहीत पध्दतीनुसार कारवाई आरोपींवर  होणार तसेच मंगळवारी रात्री दगडपेक कीत  सामिल असणाऱ्याचाही शोध घेवुन कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.एंकदरीत दारव्हा शहरात सध्या तणावपुर्ण शांतता आहे.

मृतक हा त्याच्या तिन मित्रासह सायंकाळी काही कामानिमित्त्य बाहेर गेले होता पंरतु पोलीसांनी त्याला पकडल्याचे मृतकाच्या मित्रांनी लहान भावाला सांगितल्यावर फिर्यादी लहान भावाने दारव्हा पोलीस स्टेशनला जावुन पाहले असता त्याचा भाऊ मृतावस्थेत आढळला व त्याचे दोन मित्र जमिनीवर पडुन होते.गैरअर्जदार पोलीस कर्मचारी बावणे जमादार,सचिन जाधव,संयज मोहतुरे,शब्बीर पप्पुवाले यांनी हातकडी लावुन  लाठी,लाथा व बुक्क्याने अमानुश मारहाण करुन माझ्या भावाचा खुन केला आहे तर त्याचे दोन मित्र आमिर खान समिर खान आणि गोलु शाह हे मारहाणीत जखमी झाल्याने त्यांच्यावर दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दारव्हा पोलीस स्टेशन वर दगडफेक

त्यामुळे कायदयाची पायमल्ली करीत सुनियोजीत पणे माझ्या भावाची हत्त्या चार गैरअर्जदार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्या यांनी केली असुन त्यांच्यावर विनाविलंब खुनाचा खुनाचा गुन्हा नोंद करावा अशी तक्रार मृतक शेख इरफान शेख शब्बीर यांचा लहान भाऊ शेख जाबीर शेख शब्बीर यांने दिली आहे.तसेच झालेल्या घटनेमुळे संतप्त जमावाने काल मंगळवारी रात्री ९ वाजता दरम्यान पोलीस स्टेशनवर दगडपेक केली. त्यामध्ये तिन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. त्यामुळे दारव्हा शहरात सध्या तणावपुर्ण शांतता असुन शहराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सकाळपासुनच दारव्हा शहरात शेकडो पोलीस डेरेदाखल झाले असुन शेकडो पोलीसांनी सकाळी ९.३० वाजता दरम्यान शहरातुन पथसंचलन केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad