Breaking

Post Top Ad

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

केवळ दगडांच्या चिऱ्यावर उभे असलेले शिवमंदिर

केवळ दगडांच्या चिऱ्यावर उभे असलेले शिवमंदिर

महाराष्ट्र 24 | आर्णी,यवतमाळ १२ व्या शतकाचा इतिहास दर्शविणाऱ्या आर्णी तालुक्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर बाजुला असलेल्या भुयारसदृश खोल्यांचा साधू-संत ध्यान-धारणा करित असावे. केवळ दगडांच्या चिऱ्यावर उभे असलेले शिवमंदिर इतिहासाची साक्ष देताय.


भारतीय संस्कृतीला आजही देवालये,मंदिरांनी समृद्ध करून ठेवले आहे. त्याचच एक भाग म्हणजे यवतमाळ मधील आर्णी तालुक्यातील दाभडी येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला ओंकारेश्वराचे मंदिर. 


आर्णी शहराच्या पूर्वेस अवघ्या सात किलोमीटर अंतरावरील या मंदिरात श्रावण महिण्यातच नव्हे तर बाराही महिने भक्तांची अलोट गर्दी असते. देवगिरीचा राजा रामदेवराय यांचे प्रधान हेमांद्री तथा हेमाडपंत हे शिवभक्त होते. आपल्या शिवपूजेत खंड पडू नये म्हणुन ते भ्रमंती करित असताना मुक्कामस्थळी शिवालये उभारत असतं. केवळ दगडांच्या चिऱ्यावर उभे असलेले हे मंदिर ऐतिहासिकतेची साक्ष ठरत आहे. 


पुरातन काळाचे स्मरण करणाऱ्या या मंदिरातील भव्य दिव्य शंकराची पिंड जागृत असल्याची अनेक भाविकांची श्रद्धा आहे. मुख्य गाभाऱ्यातील पिंड तब्बल साडेचार फुट उंच आहे. अशा प्रकारची पिंड कुठेही नसल्याचा अनेकांचा कयास आहे.  


१२ व्या शतकाचा इतिहास दर्शविणाऱ्या या मंदिरात डाव्या बाजूला व उजव्या बाजूला भुयारसदृश खोल्या आहेत. त्यात साधू- संत द्यान- धारणा करण्यासाठी उपयोग करित असावेत.


मंदिरासमोर असलेली पाच फूट उंचीच्या नंदीची मुर्ती आणि राभोवार असलेली लिंगे भक्तगणांना आकर्षित करण्यास पुरेसे ठरत आहे. वृंदावनाच्या चारही कोपऱ्यावरील वानराच्या मूर्त्या आहेत. 


खालच्या अंगास असलेल्या एक चौरस फूट आकाराच्या खिडक्यांमधून भाविक सरपटत प्रवेश करतात व आपली मनोकामना पूर्ण होणार, अशी कल्पना मनात साठवून ठेवतात. उत्तर प्रदेशातील रामभक्त संत मानुदास महाराजांचे या ठिकाणी वास्तव्य होते. त्यांनी बांधलेल्या या परिसरातील हनुमानाची मूर्तीला आजही प्रदेशी हनुमान म्हणुन संबोधल्या जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad