Breaking

Post Top Ad

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

यवतमाळची आक्रमक सेना कुठे गेली?

यवतमाळची आक्रमक सेना कुठे गेली?
महाराष्ट्र24यवतमाळ: राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या वर दि.९ ऑगस्ट रोजी स्पिड पोस्ट ने शरीरसुखाची मागणी केल्या प्रकरणी तक्रार घाटंजी पोलीसांना प्राप्त झाली. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.


कुठे गेली ती आक्रमक सेना?

'कोणीही यावे अन् टिकल्या मारून जावे' या म्हण प्रमाणे आमदार संजय राठोड वर कोणी पडद्यामागुन आरोप करताय. मात्र ती आक्रमक शिवसेना आणि त्याचे पदाधिकारी नेमकं गेले कुठे? फक्त पदाधिकारी म्हणुन घेण्यासाठीच आहेत का?  दोन दिवसा आगोदर वाशिम येथे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळींना आवाहन देण्याचा प्रयत्न केला मात्र वाशिमच्या कडवट आणि आक्रमक शिवसैनिकांनी जशाच तसं उत्तर दिला. यवतमाळच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाशिमच्या शिवसेनेकडे आक्रमकतेचे धडे घेण्यासाठी शिकवणी वर्ग लावण्याची गरज तर नाही ना असा प्रश्न सहाजिकच उपस्थितीत होतो.


आमदार संजय राठोड यांनी दि.१३ ऑगस्ट रोजी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्वरीत पत्रकार परिषदेत घेतली आणि त्यात झालेल्या आरोपाचे खंडन करित पोलीसांनी तपास करून सत्य बाहेर आणावे असे म्हटलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि.१४ ऑगस्ट रोजी संबंध महिलेचं जबाब घाटंजी पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आलं. त्या आमदार राठोड यांचा देखील जबाब पोलीसांनी घेतल्या नंतर शनिवारी दि.२१ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ पाटील यांनी 'ती तक्रार माझी नाहीच'असे त्या महिलेने सांगितल्याचे म्हटलं. या सर्व प्रकरणात 'एसआयटी' या विशेष पथकाने दोन्ही बाजुने तपास करून तक्रार त्या महिलेचे नसल्याचे म्हटलंय.


पोलीसांनी अधिकृत माहिती दिल्या नंतर आता प्रश्न उपस्थित होतो की, मग ती तक्रार कोणी केली? ज्या लोकांनी आमदार संजय राठोड यांची बदनामी केली त्यांनीच तर स्पिड पोस्ट ने तक्रार केली नाही ना? अजून राठोडांवर कोणता आरोप होणार आहे? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. एकंदरीत सध्याचे राजकारण अतिशय गढूळ झाल्याचे दिसते. प्रसिद्धी मिळविण्यासाठी राजकीय नेतेमंळडी किती खालच्या स्तरावर जातात हे आमदार संजय राठोड प्रकरणातून पुढे आलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad