Breaking

Post Top Ad

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात जम्बो भरतीला सुरुवात ; 2725 जागा

maharashtra health department recruitment
 

यवतमाळ : बहुप्रतीक्षित असलेल्या आरोग्य विभागाच्या भरतीला ( Arogya Vibhag Bharti 2021 ) अखेर मुहूर्त मिळाला असून भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात तब्बल 2725 जागा भरण्यात येणार आहेत. 

 

आरोग्य विभागामध्ये सुमारे 12 हजार पदांची भरती केली जाईल असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांनी दिले होते. मात्र पहिल्या टप्प्यात 2725 जागांचीच जाहिरात प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये काहीशे नाराजीचे वातावरण आहे. 

 

या भरती प्रक्रियेमध्ये भंडारपाल, वस्त्रापाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी, आहार तज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, अधिपरिचारिका, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक यासह विविध पदांची भरती होणार आहे. दि.6 ऑगस्टपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार असून 20 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

 

 या भरतीसह इतर नोकरभरतीच्या सविस्तर माहिती www.naukrimargadarshan.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad