Breaking

Post Top Ad

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

संविधानाने नागरिकांच्या एका मताला महत्व प्राप्त करून दिले:- रामदास आठवले

संविधानाने नागरिकांच्या एका मताला महत्व प्राप्त करून दिले:- रामदास आठवले

उमरखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण

यवतमाळ  : देशात अनेक जाती, धर्म आहेत, अनेकांमध्ये भांडणेही आहे, पण देश म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत. येथील प्रत्येक नागरिकाच्या एका मतात सरकार बनवण्याची व सरकार पाडण्याची ताकद असून ही ताकद डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला दिली असल्याचे प्रतिपादन भारत सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमिकरण केंद्रीय राज्य मंत्री मा.ना. रामदास आठवले आज केले. 


संविधानाने नागरिकांच्या एका मताला महत्व प्राप्त करून दिले:- रामदास आठवले

सामाजिक न्याय व सक्षमिकरण केंद्रीय राज्य मंत्री मा.ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आज उमरखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसगी आ. मदन येरावार, उमरखेड नगरपालीकेचे नगराध्यक्ष तथा आमदार नामदेवराव ससाने,  उत्तमराव इंगळे, नगरसेविका अनुप्रिया देव, सविता पाचकोरे, कविता खंडारे, पि.एल.आठवले, दिनेश राठोड़, प्रा.अनिल काळबांडे उपस्थित होते.


रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशाच्या जडनघडनमधील महत्वपुर्ण भूमिकेबाबत सांगितले. तसेच देशातील कोरोनावायरस संकट अजुन गेलेले नसुन सावधगीरी बाळगण्याचे आवाहन केले.  कोरोना मुळे आपत्ती ओढवलेल्या कुटुंबांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad