महाराष्ट्र24 । मुंबई :सुरूवातीला सकारात्मक बातम्यामुळे वाचकांच्या मनावर कमी काळात 'दिव्य मराठी'ने आपले वेगळे स्थान निर्माण केले. मात्र गेल्या काही वर्षापासून दिव्य मराठीला अभ्यासू संपादक आणि पत्रकार सोडून जात असल्याने 'दिव्य मराठी'त सकारात्मक लिहिणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतके झाल्याने नेमकं 'दिव्य मराठी'त काय चालंय बुवा अशी चर्चा सुरू आहे.
सचिन कापसेंची थोडक्यात माहिती
सचिन कापसे हे बुलढाणा येथील आहेत. जळगांव येथून दैनिक सकाळ मधून पत्रकारितेला सुरूवात केली. त्यानंतर अकोला शहराकरिता दिव्य मराठी मध्ये काम करित असताना काही महिन्यांपूर्वी संपादक सचिन काटेंनी राजीनामा दिल्याने कापसेंकडे अकोला आवृतीची जवाबदारी देण्यात आली होती.
अकोला आवृती मध्ये सचिन काटे ह्यांच्या वर संपादक पदाची जवाबदारी असताना अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यात घराघरात दिव्य मराठी नेण्याचा काम त्यांनी केला. कोरोना काळात सचिन काटेंनी अचानक संपादक पदाचा राजीनामा दिल्याने दिव्य मराठी ची काही प्रमाणात पीछेहाट झाली. तद्नंतर काटेंच्या जागी सचिन कापसे कडे अकोला आवृतीची जवाबदारी देण्यात आली. कापसेंनी इमाने इतबारे काम करून नवी टिम तयार केली.
नवराष्ट्र करिता करणार काम?
दिव्य मराठी ला जय महाराष्ट्र केल्या नंतर लगेच नवराष्ट्र ने कापसेंना संधी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतू दिव्य मराठी मध्ये चांगल्या माणसांची किंमत केल्याजात नाही हे काटे आणि कापसे यांनी दिलेल्या राजीनाम्यातून स्पष्ट होते.
सगळ काही व्यवस्थीत सुरू असताना सचिन कापसेंनी अचानक राजीनामा दिला त्यामुळे नेमकं दिव्य मराठी मध्ये चाललंय तरी काय अशी चर्चा सुरू आहे. सचिन कापसे मनमिळाऊ आणि पडद्या मागची बातमी वाचकांसमोर आणणारा पत्रकार म्हणुन ओळख आहेत. चांगल्या संपादकला राजीनामा देण्याची वेळ का आली? दिव्य मराठी मधून अजून किती जणांना राजीनामा द्यावा लागणार आहेत अशी चर्चा सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यात दिव्य मराठी बंद पडल्या नंतर काही तालुक्यात एका जिल्ह्यात दिव्य मराठी चे अंक सुरू आहेत. तिथे पण दिव्य मराठी शेवटचा घटक मोजत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response