महाराष्ट्र24 | यवतमाळ: शहरात देशातील दुसर्या क्रमांकाचा नवरात्र उत्सव साजरा केल्या जाते. नवरात्र उत्साह साजरा होत असताना मंगळवारी रात्री दरम्यान दुहेरी हत्याकांडामुळे गालबोट लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून दोघांची धारधार चाकूने आर्णी रोड वरील पल्लवी लाॅन जवळ हत्या करण्यात आली.
मंगळवारी हि घटना आठ वाजून ४५ मिनिटांनी पल्लवी लाॅन समोर घडली. यातील आरोपी अज्ञात यांनी धारधार चाकूने दोघांवर सपासप वार करून हत्या केली. काही वेळात याची वार्ता हव्यासारखी पसरली त्यामुळे नवरात्र उत्सव दरम्यान मोठी खळबळ उडाल्याचे शहरात दिसून आले. यवतमाळ शहरात नवरात्र निमित्त मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
घटनेतील मृतक नामे वाशीम पठाण हा गुन्हेगारी प्रवृतीचा होता त्याच्या डोक्यावर गंभीर गुन्हे असल्याची माहिती आहे. तर दुसरा उमेश येरमे यांचा देखील यात समावेश आहेत. मात्र दोघांची हत्या कोणी व कशासाठी केली हे अजून स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे हत्याकांडातील आरोपी देखील अज्ञात असून त्यांची ओळख पोलीसांना पटलेली नाही.
Best Bet in Casino – 1X2 Network | Shootercasino starvegad starvegad 바카라사이트 바카라사이트 3831X2 Football and Soccer Prediction - Shootercasino
उत्तर द्याहटवा