मदतनिधीचा स्वयंरोजगारासाठी उपयोग करून पुन्हा उभारी घ्या:पालकमंत्री संदिपान भुमरे
यवतमाळ : कोरोनामुळे झालेली हानी ही गंभीर आहे, मात्र त्यामुळे खचून न जाता आपल्याला मिळणाऱ्या मदत निधीचा स्वयंरोजगारासाठी योग्य उपयोग करून पुन्हा नव्याने उभारी घ्या. मदतीसाठी शासन आपल्या पाठीशी आहे, असा धीर पालकमंत्री यांनी कोविडमुळे कर्ता पुरुष गमावलेल्या कुटूंबाला दिला.
मागील दोन वर्षात जिल्ह्यात जे मृत्यू झाले त्यामध्ये दोन्ही पालक दगावलेले 10 बालक आहे व एक पालक दगावलेले 451 बालक त्यापैकी 397 बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला. याद्वारे या बालकांना दरमहा 1100 रुपये मिळणार आहे. 10 अनाथ बालकांना यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी शैक्षणिक साहित्य भेट दिले तसेच पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी वाढदिवसाच्या निमित्याने प्रत्येक बालकास 10 हजार रुपयेची मुदत ठेव देऊन एक समाजापुढे आदर्श निर्माण केला असून या उपक्रमाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही पालकमंत्री याप्रसंगी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते कोविडमुळे कर्ता पुरुष गमावलेल्या बचत गटातील 34 महिला व 10 बालकांना मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी आमदार संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, सह्याद्री फाउन्डेशनचे अध्यक्ष विजय क्षिरसागर, शिवाजीराव काकडे, मोहनराव मस्के, माविमचे रंजन वानखडे हे उपस्थित होते.
कोरोना विषाणूने मागील दोन वर्षात अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती गमावल्या कुणी घरातील कर्ता पुरुष गमावलेला आहे. अश्या कुटुंबास मदत व्हावी या उद्देशाने कर्ता पुरुष गमावलेल्या बचत गटातील 34 महिलांना सह्यांद्री फाउंडेशन यांचे द्वारे प्रत्येकी 30 हजार रुपयाची मदतीचे धनादेश तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय द्वारे कोविड मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या 10 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपयाची मदत करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response