Breaking

Post Top Ad

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

'संजय देशमुख होणार आमदार'?

'संजय देशमुख होणार आमदार'?
महाराष्ट्र24यवतमाळ: माजी मंत्री तथा विद्यमान शिवसेनेचे आमदार संजय राठोड ह्याचे विरोधक समजल्या जाणारे माजी राज्यमंत्री संजय देशमुख सध्या हे दोघे चर्चेचे विषय ठरले आहे. एका खाजगी कार्यक्रमात राठोड आणि देशमुख आमने-सामने आले होते.


दरम्यान आमने-सामने आल्यानंतर एकमेकांना बोलू नये असे होऊच शकत नाही. त्यामुळे दोघांनी एकमेकांना पाणी पुरीचा घास भरवला आणि थेट १९९९ च्या आठवणी ताज्या झाल्या.

'संजय देशमुख होणार आमदार'?

आमदार संजय राठोड आणि माजी आमदार संजय राठोड हे दोघे ही शिवसेना या विद्यालयाचे विद्यार्थी मात्र संजय देशमुख ह्यांनी शिवसेनेच्या वर्गातून दांडी मारली तर संजय राठोड कायम सेनेच्या वर्गात राहिले. दोनवेळा अपक्ष म्हणुन  देशमुख निवडून आले आणि अडीच वर्ष क्रिडा राज्यमंत्री म्हणुन देखील देशमुखांना संधी मिळाली.


आर्णी- दिग्रस मतदारसंघ रद्द झाला. तद्नंतर  संजय देशमुखांनी आपला मोर्चा दिग्रस- दारव्हा मतदारसंघाकडे वळवळा मात्र संजय राठोड नावाच्या वादळाने देशमुखांना दोन वेळा चारीमुंड्या चीत करित मोठ्या मताधिक्याने पराभव केला.


आमदार संजय राठोड आणि माजी आमदार संजय देशमुख दोघात भेट झाल्या पासून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. सध्या संजय देशमुख भाजप मध्ये आहे. मात्र भाजप मध्ये देशमुखांना जास्त महत्व दिल्या जात नसल्याने ते नाराज आहे. त्यामुळे आमदार संजय राठोड यांची देशमुखांना साथ मिळाल्यास ते शिवसेनेकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास संजय देशमुख यवतमाळ मतदारसंघातून निवडणूक लढवून बाजी मारण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. फक्त आमदार संजय राठोड ह्यांची त्यांना साथ मिळणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad