जिल्हा पोलीस अधीक्षकांमुळे प्रस्थितीत नियंत्रणात
महाराष्ट्र24 । यवतमाळ: पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काळी दौलत येथे दि.३ डिसेंबर ला एका २४ वर्षीय युवकांचा शुल्लक कारणावरून धारदार शस्त्राने निर्घून हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात काही वेळातच जातीय दंगलीचे स्वरूप निर्माण झाले.घटनेची गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ पाटील यांनी सहा जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी बंदोबस्ता करिता बोलावून प्रस्थितीत नियंत्रणात आणली.
पुसद तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणुन काळी दौलतची ओळख आहे. वीस ते बावीस गावे लागुन असल्याने नेहमी या ठिकाणी मोठी वर्दळ असते.मात्र दि.३ डिसेंबर ला शुल्लक कारणावरून युवकांची हत्या करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच तोडफोड, जाळपोळ त्यामुळे जातीय दंगलीचे स्वरूप काळी दौलत मध्ये निर्माण झाले. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी पाच जिल्ह्यातून एक हजार पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या तगडा बंदोबस्त तैनात केला त्यामुळे प्रस्थिती नियंत्रणात आणता आली.
डाॅ.भुजबळांनी दिला सक्षम अधिकारी असल्याची ओळख
काळी दौलत मध्ये जातीय दंगली उसळली. त्यानंतर जिल्ह्यात या घटनेची लोन पसरण्यास वेळ लागली नसती.मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी अतिशय हुशारीने प्रस्थितीत हाताळली. विशेष म्हणजे डाॅ. भुजबळ यांनी मृतच मुलांच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या चहा च्या कार्यक्रम दरम्यान काळी मध्ये जाण्यास कोणालाही थांबवले नाही. मृतकाच्या घरी जाण्यास पोलीसांनी नातेवाईकांना थांबवले असते तर आणखी प्रस्थितीत बिघडली आहे असती.मात्र तस न करता पोलीस अधिक्षकांनी गावात कडक सुरक्षा ठेवून मृतक मुलाच्या घरी पोलीसांचा बंदोबस्त वाढवला होता. ज्या दिवशी काळी मध्ये घटना घडली त्यानंतर काही वेळातच काळी दौलत ला जोडणारे सर्व रस्त्यावर दहा किमी अंतरावरूनच पोलीस बंदोबस्त लावला.त्यामुळे काळी मध्ये कोणाला प्रवेश करता आला नाही.गावाच्या बाहेर बंदोबस्त लावला नसता तर परिसरातील नागरिक काळी मध्ये जाऊन आरोपी आणि त्यांच्या नातेवाईकांना हालचे बेहाल करून सोडले असते. मात्र तसे घडले नाही. एकंदरीत या सर्व घडामोडी नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रस्थिती हाताळली आणि सक्षम अधिकारी कसा असावा याचा परिचय दिला.
काळी दौलत मध्ये ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी जिल्हा पोलीस अधीक्षक हे काही वेळातच दाखल झाले. प्रस्थितीत हाताबाहेर जाऊ नये म्हणुन जमावाला पांगविण्याचे धाडस देखील त्यांनी दाखविले. आठव्या दिवशी देखील काळी दौलत मध्ये दोनशे च्या वर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.शुल्लक कारणावरून झालेला वाद आणि त्या नंतर २४ वर्षाच्या युवकांची तलवारीने हत्या करण्यात आली. मात्र त्या आरोपीकडे तलवार कुठून आली याचा तपास पोलीसांनी खोलात जाऊन केला पाहीजे.जेणे करून पुन्हा अशी घटना त्या ठिकाणी घडणार नाही. काळी दौलत मध्ये पोलीस स्टेशन निर्माण करणे आवश्यक आहे. हे घडलेल्या घटनेवरून पोलीस अधिक्षकांच्या लक्षात आलेच असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response