यवतमाळ : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करणारे उपक्रमशील शेतकरी व युवा उद्योजक गजानन पोटे यांची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गजानन पोटे हे विविध सामाजिक कार्यांमध्येही सक्रिय असतात. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. केवळ बळीराजा सुखी भव म्हणून चालत नाही. त्याला कृतीचीही जोड द्यावी लागते. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविणे, शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न करणे देखील आवश्यक असते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देण्याचा मानस गजानन पोटे यांनी व्यक्त केला. यापूर्वीही त्यांनी विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन शेती प्रश्नांसाठी आवाज बुलंद केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांचे विचार व शेतकऱ्यांसाठी असलेल्या त्यांच्या संकल्पनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करणार असल्याचा निर्धार पोटे यांनी केला आहे. गजानन पोटे यांनी आपल्या निवडीचे श्रेय मनसे राज्य उपाध्यक्ष आनंद यंबडवार, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मनसे जिल्हा उपाध्यक्ष साजिद अब्दुल रहेमान, मनसे तालुकाध्यक्ष संजय देठे, विकास पवार यांना दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response