Breaking

Post Top Ad

बुधवार, २७ एप्रिल, २०२२

'बाळासाहेब मुनगिंवारांनी नाफडेला दिला अल्टिमेटन'

'बाळासाहेब मुनगिंवारांनी नाफडेला दिला अल्टिमेटन'
महाराष्ट्र24 | यवतमाळ : राज्याच्या राजकारणात भोंग्याचा राजकारण सुरू असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न बाजुला पडल्याने शिवसेनेचे यवतमाळचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी नाफेड ने जिल्ह्यात खरेदी केंद्र वाढवून कासवगतीने सुरू असलेली खरेदी जलदगतीने सुरू करण्याच्या मागणीसाठी सायकल वर भोंगा बांधून नाफेड च्या खरेदी केंद्रावर जाऊन अनोखा आंदोलन केले.यावर्षी कधी नव्हे एवढा चांगला उत्पादन हरभऱ्याचा शेतकऱ्यांना झाला आहे.एकरी नऊ ते दहा क्विंटल हरभरा झाला असताना नाफेड ने मोजक्याच ठिकाणी खरेदी सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात केवळ आठ ठिकाणी नाफेड ची खरेदी सुरू आहे.

'बाळासाहेब मुनगिंवारांनी नाफडेला दिला अल्टिमेटन'

जिल्ह्यात नाफेड ची मोजक्याच ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. शासनाचे चना ला हभी भाव पाच हजार दोनशे तीस रूपये असताना नाफेड च्या खरेदी अभावी शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने मोठा नुकसान सहन करावा लागत आहे.शेतकऱ्यांनी चना खाजगीत विकल्यास त्यांना क्विंटल मागे एक हजार रूपयांचा नुकसान सहन करावा लागतोय. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी सायकल वर भोंगे बांधून नाफेड चा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान नाफेड च्या खरेदी केंद्रावर जाऊन येत्या ३ मे पर्यंत जिल्ह्यात सगळ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत शासकीय खरेदी सुरू न केल्यास आम्ही नाईलाजाने नाफेड ला शिवसेना स्टाईलने धडा शिकण्याच्या इशारा दिला आहे.

'बाळासाहेब मुनगिंवारांनी नाफडेला दिला अल्टिमेटन'
नाफेड कडून कासवगतीने आणि मोजक्याच ठिकाणी चना खरेदी सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे दोन महिन्यांपर्यंत वेटिंग राहून नंबर लागण्याची वाट शेतकऱ्यांना पाहावी लागते.सध्या लग्नसराई चे दिवस सुरू आहे.अशात नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खाजगीत हरभरा विक्री करावा लागतो. दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी नाफेड च्या खरेदी केंद्रावर मारोती स्तोत्र पठण करून नाफेड चा निषेध करित त्वरीत जिल्ह्यात नाफेड ने खरेदी केंद्र सुरू करावी अन्यथा पुढील परिणामाला सज्ज रहा असा इशारा यावेळी दिलाय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad