Breaking

Post Top Ad

सोमवार, १३ जून, २०२२

'अखेर आमदार संजय राठोड होणार नामदार'

'अखेर आमदार संजय राठोड होणार नामदार'

महाराष्ट्र24
मुंबई: पूजा चव्हाण प्रकरणात आमदार संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.त्या प्रकरणात कुठेही गुन्हा दाखल झालेला नसताना केवळ भाजपाने केलेल्या आरोपामुळे राठोड यांना मंत्री पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली होती. दोन दिवसापूर्वी बंजारा समाजाच्या महंतांनी पुणे पोलीसांची भेट घेऊन सत्य काय ते राज्यातील जनतेला कळू द्या.या प्रकरणात आमच्या समाजाची मोठी बदनामी झालीय.समाजासाठी लढणाऱ्या आमदार संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.त्यामुळे पुणे पोलीसांनी पूजा चव्हाण प्रकरणात आत्महत्या किंवा अपघात अशी नोंद 'राजपत्रात' घेण्यात आल्याने 'वनवाडी पोलीसांनी' आमदार राठोड यांना निर्दोष असल्याचे म्हटले आहे.


बंजारा समाजात सध्या तरी आमदार संजय राठोड हेच एकमेव 'मास लिडर' आहेत.त्यामुळे पोहरादेवीचे सर्व महंत आमदार संजय राठोड यांना सन्मानाने पुन्हा मंत्री मंडळात घेण्यासाठी सर्वप्रयत्न करित आहे.देशमुख प्रकरणात न्यायालयाने सरकार वर ताशेरे ओढल्यानंतर राजीनामा घेण्यात आला.राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक सध्या इडी प्रकरणात जेल मध्ये असताना अद्यापही सरकारने त्यांचा राजीनामा घेतलेला नाही.आमदार संजय राठोड यांच्या वर भाजप ने केवळ आरोप केले तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष 'शरद पवार' हे राठोडांवर नाराजी व्यक्त करतात.म्हणजे शरद पवार हे बंजारा समाजाच्या विरोधात असल्याचा मेसेज समाज बांधवामध्ये गेलाय.त्यामुळे शरद पवार बदल बंजारा समाजातून प्रचंड नाराजी व्यक्त केल्या जात आहे.


'अखेर आमदार संजय राठोड होणार नामदार'

आमदार संजय राठोड यांना मंत्रीमंडळात पुन्हा संधी देण्यात यावी यासाठी कालच महंतानी एकनाथ शिंदेची भेट घेतलीय.बंजारा समाजाचं शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.त्यामुळे संजय राठोड यांच्या वाढदिवसाच्या आधी त्यांना मंत्रीमंडळात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्याबाबत विचार करतील अशी अपेक्षा बंजारा समाजातील नागरिकांना आहे. आमदार संजय राठोड हे बंजारा समाजातील एक उमळत नेतृत्व आहे.त्यामुळे राठोड यांना मंत्रीमंडळात संधी देणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad