Breaking

Post Top Ad

बुधवार, २० जुलै, २०२२

आर्णीतील समस्या त्वरित सोडवा;प्रिया शिंदे

आर्णीतील समस्या त्वरित सोडवा;प्रिया शिंदे
महाराष्ट्र24आर्णी: शहरात पावसाळ्यात पालिकेने दुर्लक्ष केल्याने शहरातील नागरिकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावा लागत आहे.अशात प्रिया शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात पाहणी करून समस्याचा पाढा मुख्याधिकाऱ्यां समोर वाचला. शहरातील रस्त्यावरील पडलेले खड्डे पंधरा दिवसात बुजविण्याचा अल्टिमेटन दिला आहे.


आर्णी पालिकेत मनमानी कारभार सुरू असल्याने ले-आऊट धारकांनी चक्क नाल्याची रुंदी कमी केल्याने नागरिकांना पावसाळ्यात पुराचा सामना करावा लागत आहे.परिणामी नागरिकांच्या घरात रात्री बे रात्री पुराचे पाणी घरात शिरत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे त्या ले-आऊट धारकांनावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी प्रिया शिंदे यांनी मुख्याधिकारी कडे केली आहे.


आर्णी नगर परिषद कायमच या ना त्या कारणावरून चर्चेत असते.त्यातच प्रिया शिंदेनी शहरातील सर्व प्रभागात भेट देऊन समस्या जाऊन घेतल्या त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांना जाणवत असलेल्या समस्या त्वरित सोडविण्या बाबत अल्टिमेटन दिला आहे.त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे पालिकेचे मुख्याधिकारी हे वाशिम वरून ये-जा करत असल्याने त्यांचा कोणावर ही वचक नसल्याचे बोलल्या जातेय.वाशिम वरून ये-जा करत असल्याने शहरातील अनेक समस्या सोडविण्यात मुख्याधिकारी अपयशी ठरत असल्याची चर्चा शहरात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad