Breaking

Post Top Ad

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

'अखेर संजय देशमुखांच ठरलं'

'अखेर संजय देशमुखांच ठरलं'
महाराष्ट्र24 यवतमाळ : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्य काही दिवसांपासून माजी मंत्री संजय देशमुख  शिवबंधन बांधणार अशी चर्चा सुरू होती. माजी मंत्री आणि भाजपचे नेते संजय देशमुख यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा भेट देखील घेतली आहेत.मागील आठवड्यात शिवसेना भवन मध्ये सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील देशमुखांनी भेट घेऊन पक्ष प्रवेश बाबत चर्चा केली आहेत.


साडे तीन महिन्यापूर्वी राज्याच्या राजकारणात सत्ता बदल झाली.शिवसेनेतून ४२ आमदारांनी बंडखोरी करत भाजप बरोबर सत्ता स्थापन केली. दरम्यान दिग्रस-दारव्हा मंतदारसंघाचे विद्यमान सेनेचे आमदार संजय राठोडांनी देखील सेनेसोबत बंडखोरी केल्याने त्याला टक्कर देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुखांनी कंबर कसली आहेत.लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad