Breaking

Post Top Ad

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

यवतमाळमध्ये शिंदेगटाला मोठा झटका

 

यवतमाळमध्ये शिंदेगटाला मोठा झटका


महाराष्ट्र24 : यवतमाळ शिंदेगटाचे यवतमाळ जिल्हाप्रमुख तथा सहकार क्षेत्रातील मोठा चेहरा म्हणुन ओळख असलेले गजानन बेजंकीवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठी खबबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना आत्मपरीक्षण करा म्हणत जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिंदे गटाला यवतमाळमध्ये मोठा झटका मानल्या जात आहे.

गजानन बेजंकीवार हे गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र अलीकडे सहा महिन्यापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मंत्री संजय राठोड मागे राहणं त्यांनी पसंत केलं होते. विशेष म्हणजे संजय राठोड यांचे ते खंदे समर्थक म्हणून देखील ओळखले जाते मात्र अचानक पणे मंत्री संजय राठोड यांच्यावर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिल्याने शिंदे सेना मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी देखील मंत्री संजय राठोड वर नाराजी व्यक्त करत मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं होतं. पूजा चव्हाण प्रकरणात महंत सुनील महाराज हे मंत्री संजय राठोड यांची भक्कम बाजू त्यांनी मांडली तरी देखील राठोड वर नाराजी व्यक्त करत शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश केलं. त्यानंतर शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख गजानन बेजंकीवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याने अनेकांना धक्का बसला आहेत.मात्र अद्यापही गजानन बेजंकीवार यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad