Breaking

Post Top Ad

गुरुवार, ५ जानेवारी, २०२३

शिंदेगटाचे किती आमदार खासदार निवडून येणार?

शिंदेगटाचे किती आमदार खासदार निवडून येणार?
महाराष्ट्र24 । मुंबई: राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात सर्वात मोठा बंड शिंदे गटाच्या टोळीने केलं. बंडखोरी केल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार राज्यात नव्याने अस्तित्वात आले त्यानंतर शिंदे गटात अनेक आमदार प्रचंड नाराज असल्याची माहिती पुढे आली आहेत.


शिवसेनेसोबत शिंदे गटाने केलेली बंडखोरी राज्यातील मतदारांना आवडलेली नाही.विशेष म्हणजे निष्ठावंत शिवसैनिकांना तर अजिबात आवडली नाही.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा संपूर्ण आयुष्य पणाला लावून शिवसेना वाढवली मात्र भाजपने शिंदे गटाला हाताशी धरून एकाक्षणात शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला खरा पण हे प्रकरण भाजपच्या अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्यांच्याच हाताने शिवसेना संपविण्याचा प्रयत्न चालविल्या जात आहेत.


शिवसेने मधून आमदार आणि बारा खासदार यांनी बंडखोरी करून भाजपसोबत घरोबा केला मात्र हे सामान्य नागरिकच नागरिकांचं निष्ठावंत शिवसैनिकांना आवडलेला नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदे गटाचे किती आमदार निवडून येतील हा मोठा प्रश्न राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला जात आहेत. त्यातच ईडीच्या भीतीने आमदार खासदारांनी कोलांडी मारल्यानंतर त्यांच्याच मतदारसंघातून बंडखोर आमदार - खासदार विरोधात रोष व्यक्त होतांना दिसत आहे.


शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतल्या गेली त्यानंतर उद्धव ठाकरेंची लोकप्रिय भर पडली त्यामुळे भयभीत झालेल्या भाजपने सेनेला संपविण्याचा प्रयत्न केला आणि ४२ आमदारासह बारा खासदारांना सेनेतून बंडखोरी करण्यास भाग पाडल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.


शिवसेना हे एक पक्ष जरी असला तरी ते एक विचार आहेत आणि विचाराला कोणी संपवू  शकत नाही, ही एक काळ्या दगड्यावरची रेष आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना तेवढ्याच ताकतीने आणि जोमाने आमदार,खासदार निवडून येतील असा विश्वास सामान्य नागरिकांतून बोलल्या जात आहेत.शिवसेनेत बंडखोर झाल्यानंतर अख्या देशातून सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिका सह २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभाच्या निवडणुकीत सकारात्मक चित्र दिसतील असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad