महाराष्ट्र24 । यवतमाळ:
यवतमाळ नजिक कीन्ही इंथे येत्या 13ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी येणार होते.मात्र ऐनवेळी मुख्यमंत्र्याचे खाजगी डाॅ.अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकारी डाॅ.पंकज आशिया यांना पत्राद्वारे माहिती देऊन 13 ऑक्टोबर ऐवजी 27 ऑक्टोबर ला मुख्यमंत्री शिंदे यवतमाळच्या दौऱ्यावर येणार असल्याचे कळविले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचा याआधी एक जुलै रोजी दौरा ठरला होता.मात्र एक जुलै चा दौरा अचानक रद्द करण्यात आला.त्याची कारणे अद्यापही यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना समजली नाहीत.त्यातच दुसऱ्यांदा म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने जिल्हा प्रशासन कामाला लागला असताना ऐनवेळी दौरा रद्द चा पत्र धडकला.
मुख्यमंत्र्यांना यवतमाळचा दौरा रद्द का करावा लागतो? आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात येण्याची मुख्यमंत्र्याची कदाचीत इच्छा होत नसावी? अशी चर्चा दौरा रद्द झाल्याने नागरिकांमध्ये सुरू आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response