महाराष्ट्र24 । यवतमाळ :
राज्याला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांच्या रूपाने दोन मुख्यमंत्री देणाऱ्या पुसदच्या बंगल्याला लवकरच लाल दिव्याची लाॅटरी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आमदार इंद्रनिल नाईक यांची मंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.सध्या मंत्री मंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहेत.अजित पवार गटाला दोन मंत्री पद मिळणार आहे.त्यामुळे इंद्रनिल नाईक यांच्या रूपाने जिल्ह्याला दुसरा मंत्री मिळणार आहे.
संपूर्ण राज्यात नाईकांचा चाहता वर्ग मोठा आहे.विशेषतः बंजारा समाजात नाईकांना मोठ महत्व आहे.अलिकडे 'भाजपा'ने त्यांच्या कोट्यातून 'निलय नाईक' यांना विधान परिषदेवर घेऊन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न भाजपने केलाय.
काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडली.त्यानंतर लोकनेते तथा माजीमंत्री मनोहराव नाईक यांनी अजित पवार गटाला साथ दिली.त्यामुळे अजित पवार हे इंद्रनिल नाईक यांना मंत्री करून परतफेड करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बोलल्या जात आहे.इंद्रनिल नाईक यांची आमदारकीची पहिलीच टर्म अससल्याने त्यांना राज्यमंत्री म्हणुन संधी दिल्या जाऊ शकते.इंद्रनिल नाईकांना मंत्री केल्यास अजित पवार गटाला त्याचा मोठा फायदा देखील होऊ शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response