Breaking

Post Top Ad

रविवार, २३ जून, २०२४

'आर्णीत काॅग्रेसच्या तीन नेत्यांनी केलं 'भाजपा'चं काम'

'आर्णीत काॅग्रेसच्या तीन नेत्यांनी केलं 'भाजपा'चं काम'
महाराष्ट्र24: - चंद्रपूर- आर्णी लोकसभा मतदार संघात दिवंगत खासदार 'बाळू धानोरकर' यांच्या निधनानंतर धानोरकर कुटूंबिया बरोबर प्रचंड सहानुभूतीची लाट पसरली अन् खासदार प्रतिभा धानोरकर ह्या रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी झाल्या.एक 'विधवा' महिला सत्ताराधारी आणि हुकूमशाही विरोधात लढत असताना मात्र आर्णी मध्ये काॅग्रेसच्या तीन नेत्यांना थेट बोली लावून विकत घेतल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीत काम न केल्याचे समोर आल्या नंतर अनेकांना तर धक्काच बसला आहेत.


ज्या काॅग्रेस पक्षाने या तीन नेत्यांना भरभरून दिलं त्याच काॅग्रेस पक्षाच्या विरोधात लोकसभा निवडणुकी दरम्यान विरोधात काम करण्यासाठी 'आर्णीचा भैय्या, आंबोड्याचे काका आणि 'सुंदर शनी'च्या 'दादा' यांनी 'महात्मा गांधी' वर प्रेम करणं अधिक पसंद केलं.मात्र त्यांना जराही एक विधवा महिला महाशक्ती विरोधात लढत आहे आणि आपण सगळ्यांनी तिला साथ द्यावी असं त्यांना वाटलं नाही, त्यामुळे तिघांविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहेत.


लोकसभा निवडणुकीत त्या तिघांनी काॅग्रेस विरोधात काम केलं हे सर्वांना माहिती आहेत.मात्र मतदारांनी त्यांना भीक न घालता 'प्रतिभा धानोरकर' यांच्या बाजुने मतदान केल.त्यामुळे तिघांना मतदारांनी जागा दाखविल्याची उघड चर्चा सुरू आहे.माजीमंत्री 'शिवाजीराव मोघे' हे त्या तिघांची काॅग्रेस मधून हकालपट्टी करणार का असा सवाल या निमित्याने विचारला जात आहेत.'खासदार धानोरकर' यांच्या नजरेतून ते तिघे तर कधीचेच पडले आहेत.विशेष म्हणजे त्या तिघांनी एक मोठी काॅग्रेसच्या विरोधात साखळी तयार केली होती.तरीही मतदारांनी काॅग्रेसच्या बाजुने मतदान केले.त्यामुळे त्या तिघांची बोलती बंद झाली असून चंद्रपूर वाल्या भाऊंचा कधी फोन येईल आणि कधी त्यांच्या घरी माणूस वसुलसाठी जाईल याचा काही नेम नाही.याची देखील चिंता त्या तिघांना सतावत असल्याचे बोलल्या जात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad