महाराष्ट्र24 : सध्या काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहेत.अशात जनतेपर्यंत पोहचण्यासाठी रोजंदारीवर माणसं आणून विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्याचा प्रयोग काही नवीन राहिलेला नाहीय.अशात आर्णीत महाविकास आघाडीकडून काॅग्रेसचे युवराज यांनी शेतकऱ्यांसह नागरिकांच्या प्रश्नांसाठी जनआक्रोश मोर्चा काढला आणि उघड नाराजी समोर आली.
काॅग्रेसचे माजीमंत्री मंत्री आणि आदिवासी काॅग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.शिवाजीराव मोघे यांचे चिरंजीव एवढीच ओळख असलेले जितेंद्र मोघे हे पाच वर्षात कुठे आणि कधीही जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले नाही.किंवा जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांच्यावर कोणतीही केसेस देखील नाही.ऐन निवडणूक तोंडावर असताना शेतकऱ्यांसह नागरिकांच्या विविध प्रश्न घेऊन तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढला खरा पण यात शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे पदाधिकारी नाराज होते.कारण काय तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फलकांवर न लावल्याने कट्टर शिवसैनिक दुखावला त्यामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी या मोर्चा पासून दोन हात लांब राहणे पसंद केले.
....हा तर महिलांचा अवमान?
सरकार ऐकीकडे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात आणि कुटुंबात भागीदारी वाढविण्यासाठी अनेक योजना राबवत असताना मात्र जितेंद्र मोघे बंजारा समाजाच्या प्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडेंचा फोटो न लावता एकप्रकारे महिलांचा अवमान करित असल्याची चर्चा सुरू आहेत.
आर्णी-केळापूर मतदारसंघात काॅग्रेसची ताकद आहेत.मात्र लोकसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याची चर्चा सुरू असताना विधानसभेला जर का जितेंद्र मोघेंना उमेदवारी मिळाली तर काॅग्रेसचा एक मोठा गट विरोधात काम करणार असल्याची आता पासूनच जोरदार चर्चा सुरू आहेत.त्यामुळे घरातूनच जितेंद्र मोघेंना विरोध होत असल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहेत.यंदाच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुळे राज्यात महाविकास आघाडीला चांगले दिवस आले आहेत.काॅग्रेसने आर्णी-केळापूर मतदारसंघात माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतविल्यास निवडूण येण्याची उघड चर्चा सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहेत.मात्र युवराज मात्र निवडणूक लढविण्याचा हट्ट धरून बसल्याची चर्चा सुरू आहेत.
'होर्डिंगवर एकाही बंजारा नेत्यांचा फोटो लावलेला नाही'
जितेंद्र मोघेंना बंजारा समाजाची अलर्जी?
माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी अनेकवेळा बोलून दाखविले की,"मी वसंतराव नाईक साहेब यांचा मानलेला पुतण्या असून संत सेवालाल महाराज यांचा भक्त आहेत".ते नेहमी तेलंगणात संत सेवालाल महाराज यांच्या मंदिरात जाऊन दरवर्षी दर्शन घेऊन येतात हे देखील तितकेच खरे.मात्र त्यांचे सुपूत्र जितेंद्र मोघे यांना बंजारा समाज आणि त्यांच्या नेत्यांची अलर्जी असल्याचे अनेकवेळा उघड झाले आहेत.जन आक्रोश मोर्चा दरम्यान लावलेल्या होर्डिंगवर बंजारा समाजाच्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि काॅग्रेसचे जेष्ठनेते स्व. रामजीभाऊ आडे यांच्या सून सौ. माधुरी आडे यांचा होर्डिंगवर फोटो न लावल्याने मोघे विरोधात नाराजीचा सुर उमटत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response